भारतीय संस्कृतीचा भाग असलेलं आणि जेवणानंतर अनेकांना हमखास आठवणारं पानही आता मुंबईमध्ये शुगर फ्री मिळतंय.
मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या 'द पान स्टोरी' या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाण्याचे पान मिळतात.
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खास डायबिटीज पान तयार करण्यात आल आहे.
'शुगर फ्री' असं याचं नाव असून यामध्ये वेलची, लवंग, खोबरं, भाजकी बडीशोप, धना डाळ, काजू बदाम, हरी पत्ती, केसर, सोन्याचा वर्ख याचा समावेश करण्यात आला आहे.
मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरिरातील कोणत्याही प्रकारची साखरेची पातळी हे पान खाल्ल्यावर वाढत नाही.
या पानांमध्ये अनेक औषधी पदार्थ आहेत. जेवणानंतरच्या पचनक्रियेसाठी ही पान उत्तम आहे.
50 रुपयांपासून या पानाची किंमत असून यामधील सर्वात प्रिमियम पानाची किंमत ही 700 रुपये असल्याची माहिती नौशाद शेख यांनी दिली.
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
Click Here