भारतात काही दूर्गम गावे, वाड्या-वस्त्यांवर अद्याप आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत.
महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यातील दूर्गम भागात अशी काही वंचित गावे आहेत.
या गावांपर्यंत फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.
उर्वी अशोक पिरामल फाउंडेशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गेल्या 13 वर्षांपासून ही सामाजिक संस्था आरोग्य व शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.
सध्या संस्थेच्या वतीने 4 फिरते दवाखाने चालवले जात आहेत.
वर्धा व नागपूर जिल्ह्यातील 145 दूर्गम गावांमध्ये फिरता दवाखाना आरोग्य सेवा पुरवत आहे.
विशेष म्हणजे या दवाखान्यांत केवळ 25 रुपयांमध्ये उपचार केले जातात.
फिरता दवाखाना गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरत आहे.
या प्रकल्पामुळे वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी महिलांना फायदा झाला आहे.
वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!
Click Here