हरवलेला मोबाईल कसा मिळवाल?

मोबाईल चोरीचे प्रमाण सध्या वाढलंय. मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही. 

चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी अनेकांची समजूत असते. 

मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो. 

 याबाबत नेमकं काय करावं याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिलीय.

तुमचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या वेबसाईटवर जा.

 या वेबसाईटवर नोंद केल्यास पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं जाण्याची गरज नाही. 

या वेबसाईटच्या पहिल्या पेजवर तीन ऑप्शन दिले आहेत. 

यामध्ये मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ब्लॉक करणे, आपला मोबाईल शोधण्याचे काम कुठपर्यंत आले त्याचे स्टेटस् चेक करणे. 

 आणि पुन्हा मिळाल्यास तो अनब्लॉक करणे, असे हे तीन ऑप्शन आहेत.

त्यामध्ये काही नंबर, हरवलेल्या मोबाईलचा आईएमईआई हा नंबर द्यावा लागतो.

 तो मोबाईल कधी, कुठून आणि कसा हरवला यासंदर्भात माहिती द्यावी लागते. 

त्यानंतर ही सर्व माहिती पोलिसांना मिळते.त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये या मोबाईल चोरीची नोंद केली जाते.

तुम्हाला यापैकी कोणताही पर्याय शक्य नसल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार करावी.

तुम्हाला यापैकी कोणताही पर्याय शक्य नसल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार करावी.

ही तक्रार करण्यासाठी मोबाईलची पावती किंवा तो बॉक्स जपून ठेवणे आवश्यक आहे, असा सल्ला कुराडे यांनी दिलाय.

मोबाईल चुकून कुठे हरवला असेल आणि तो कुणी उचलला तर पोलिसांचा फोन आहे असं कळल्यावर संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन जमा करते.

फोनवरील जाहिराती कश्या बंद कराव्या

Click Here