कल्याणची चाळ ते टीव्ही स्टार
गुणवत्ता असेल तर ती लपत नाही. कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी तुम्ही यशस्वी होऊ शकता.
लहान वयातही मोठं आव्हान पेलू शकता. हे कल्याणच्या हर्षदा कांबळेनं दाखवून दिलंय.
एका चाळीत राहणारी ही 9 वर्षांची चिमुरडी टीव्ही इंडस्ट्रीमधील स्टार बनलीय.
अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं कामातून ठसा उमटवलाय.
चाळीत राहणाऱ्या या मुलीचा स्टारपर्यंतचा प्रवास हा फक्त गुणवत्तेच्या जोरावर झालाय.
हर्षदाचे वडिल विक्रांत कांबळे हे ठाण्यात नोकरी करतात. ते कामातून वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रमात निवेदन आणि गाणी सादर करत.
त्यावेळी ते हर्षदालाही तिथं घेऊन जात. हर्षदालाही याची आवड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यानंतर त्यांनी तिला डोंबिवलीचे डॉ. ज्ञानेश्वर सकपाळ यांच्या बालनाट्य शिबिरात पाठवलं.
या शिबिरात तिला अभिनयाचे पहिले धडे मिळाले, अशी माहिती विक्रांत यांनी दिली.
'माझी तुझी रेशीमगाठी' या मालिकेसाठी ठाण्यात ऑडिशन आहेत, अशी माहिती हर्षदाच्या घरच्यांना कळाली.
त्यावेळी हर्षदानं तिथं ऑडिशन दिली. त्या मालिकेत परीची मैत्रिण म्हणून हर्षदाची निवड झाली.
हर्षदानं त्यानंतर 'रंग माझा वेगळा', 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकांमध्ये काम केलंय.
त्याचबरोबर 'लव्ह कनेक्शन' हा हिंदी सिनेमाही केला आहे,' असं हर्षदाची आत्या मीना कांबळे यांनी सांगितलं.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here