वयाच्या 68 व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशी बॉडी
आपले शरीर तंदुरस्त राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.
अनेकजण जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. काही योग करून शरीर आणि मनाची सांगड घालतात.
तर काही लोक आहाराची पथ्ये पळून शरीर फिट ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.
परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना शरीराची देखभाल करण्यासाठी वेळ मिळत नाही.
म्हणूनच हल्ली वयाची 40 शी पार केल्यानंतर अनेक व्याधी जडतात.
मात्र, वयाच्या 68 व्या वर्षी देखील पिळदार शरीर कमवनारे जालन्याचे कल्याण शिंदे तरुणाईसाठी आदर्श ठरत आहेत.
जालन्यातील अंबड चौकी भागामध्ये कल्याण शिंदे राहतात.
लहान असताना त्यांची ताब्यात खूपच कमी होती. त्यामूळे वडील त्यांना दोन शर्ट घालायला सांगायचे.
यामुळे तरी आपला मुलगा सदृढ दिसेल असं त्यांना वाटायचं. वडिलांची हीच कृती कल्याण शिंदे यांचा मनाला लागली.
वयाच्या 18 व्या वर्षांपासून त्यांनी नियमित व्यायाम करण्यास सुरुवात केली.
आजतागायत ते नियमित व्यायाम करतात. याच जोरावर त्यांनी तरुणांना लाजवेल अशी बॉडी कामवली आहे.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here