महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा असून येथील मातीत अनेक दिग्गज मल्ल घडले.
कुस्ती पंढरी कोल्हापुरात सांगली परिसरातूनही अनेक मल्ल येत असतात.
मल्लांना व्यायामासोबतच चांगल्या खुराकाचीही गरज असते.
पैलवानांच्या खुराकातील थंडाई हा महत्त्वाचा घटक आहे.
इस्लामपुरातील संग्रामसिंह जाधव हे महाबली केसरी पैलवान आहेत.
कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये पैलवान संग्राम याने शाही थंडाईचा व्यवसाय सुरू केला.
अल्पावधितच पैलवान संग्राम यांच्या शाही थंडाईच्या 14 शाखा सुरू झाल्या आहेत.
विशेष म्हणजे 13 शाखा महाराष्ट्रात तर 14 वी शाखा थेट दुबईत सुरू झाली आहे.
सांगलीतील पैलवानाच्या शाही थंडाईला दुबईतही मोठी मागणी आहे.
पैलवानांसोबतच सामान्य लोकही शाही थंडाई आवडीने पित असून आरोग्यासाठी थंडाई लाभदायी आहे.
वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!
Click Here