दहावीनंतर मुलींना 'या' कोर्सची संधी!

दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचं? हा यक्षप्रश्न विद्यार्थ्यांपुढं असतो. 

सध्याच्या काळात विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

बीडमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी विविध कोर्स उपलब्ध आहेत. 

यामध्ये ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, ड्रेस मेकिंग असे 6 कोर्स उपलब्ध आहेत.

सेक्रेटरी प्रॅक्टिस, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल हे कोर्सही उपलब्ध आहेत.

या कोर्सच्या माध्यमातून मुलींना स्वयंरोजगार देखील उपलब्ध होत आहे.

दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. 

https://admission.dvet.gov.in/  या संकेत स्थळावर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल. 

संस्थेच्या 02442 222448 या क्रमांकावर संपर्क साधूनही चौकशी करता येते. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड, असा संस्थेचा संपूर्ण पत्ता आहे.

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here