1 मे 2023 रोजी महाराष्ट्राच्या निर्मितीला 63 वर्षे पूर्ण झाली आहेत.
महाराष्ट्राच्या सीमा भागात अशी काही गावं आहेत, जिथं अद्याप मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत.
महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर चंद्रपूर जिल्ह्यात असंच एक गाव आहे.
जिवती तालुक्यातील प्रेमनगर येथे अद्याप कोणत्याही सरकारी सुविधा पोहोचलेल्या नाहीत.
प्रेमनगर येथी लोकांची घरं महाराष्ट्रात तर शेती तेलंगणा राज्यात आहे.
दोन राज्याच्या मध्ये मारलेल्या एका रेषेनं इथला विकासच खुंटला आहे.
महाराष्ट्रासह तेलंगणा सरकार सुद्धा या गावाकडे दूर्लक्ष करत आहे.
गावातील तरुणांची कागदपत्रे दोन राज्यात विभागली असल्याने नोकरी मिळत नाही.
आम्हीही भारताचे नागरिक असल्याने सुविधा मिळाव्यात अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
Click Here