वायू प्रदूषण मोजणं होणार सोपं!

प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यासाठी संशोधन व उपाययोजना राबिण्यात येतात. 

पर्यावरण क्षेत्रात सखोल अभ्यास करणारी CSIR NEERI ही संस्था भारतात प्रसिद्ध आहे.

नागपूरमधील या संस्थेच्या वैज्ञानिकांनी एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. 

प्रदूषणाचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे. 

या ड्रोनच्या माध्यमातून वायू प्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार आहे. 

नीरीने या उपकरणाचे नाव नीरी-क्षण- एक्यू  असे ठेवले आहे. 

उंच व दुर्गम क्षेत्रमध्ये आणि वास्तविक वेळी प्रदूषकाचे प्रमाण GPS द्वारे घेता येणार आहे. 

या संशोधनामुळे सॅम्पलिंगची किंमत आणि मनुष्यबळाची बचत होणार आहे.

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here