15 वर्षांच्या मुलीने उभारली पुस्तकांसाठी मोठी चळवळ!
सोशल मीडिया आणि मोबाईल गेम्स यांचा मोठा पगडा सध्या मुलांवर आहे.
त्यामुळे त्याचं वाचन कमी झालंय, अशी ओरड नेहमी ऐकू येते.
मुलांना वाचनाची गोडी वाढावी म्हणून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
शाळा, महाविद्यालय तसंच सामाजिक संस्थांचा यामध्ये समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील 9 वी मधल्या मुलीनं याबाबत पुढाकार घेतलाय.
तिच्या प्रयत्नानं शहरात वाचनसंस्कृतीचा प्रसार होण्यास मदत होतीय.
छत्रपती संभाजीनगरमधील सेवन हिल्स परिसरात राहणाऱ्या मिर्झा मारियम या नववीतल्या मुलीनं मोहल्ला ग्रंथालय ही चळवळ सुरू केलीय.
मारियमला सुरुवातीपासूनच वाचनाची आवड आहे.
लॉकडाऊनच्या काळात आपल्याप्रमाणे इतर मुलांनाही वाचायला मिळावं हा तिचा प्रयत्न होता.
त्याचवेळी आपल्याला ही कल्पना सुचली, असं मारियमनं सांगितलं.
या 300 पुस्तकांसह मी पहिलं मोहल्ला ग्रंथालय सुरु केलं. आता 32 ठिकाणी ही ग्रंथालय सुरू आहेत.
आमची सर्व ग्रंथालय ही पुस्तकाच्या एका कपाटात आहेत.
पुस्तकाची ही कपाट शहरातील वेगवेगळ्या घरांसह मंदिर, मशिद आणि हॉस्पिटलमध्येही आहेत, असंही मारियमनं सांगितलं.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here