'या' विहिरीतील पाण्याने होतात त्वचारोग बरे?

भारतात खेड्या-पाड्यात असणाऱ्या मंदिरांशी अनेक आख्यायिका जोडलेल्या असतात. 

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजीपंत) जवळ सत्याग्रही घाट संकुल आहे.

या संकुलातील टेकडीजवळ बाहुबली हनुमानाचे मंदिर आहे. 

सत्याग्रही घाट संकुलात एक प्राचीन विहीर असून तिला बाहुबली विहीर म्हणून ओळखले जाते. 

श्यामजी पंत महाराजांनी ही विहीर 350 वर्षांपूर्वी बांधल्याचे सांगितले जाते.

विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते, असा परिसरातील नागरिकांचा समज आहे. 

बाहुबली विहिरीबाबत असणाऱ्या आख्यायिकेमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे.

शनिवार आणि मंगळवारी या विहिरीतील पाण्याने आंघोळ करण्यासाठी भाविकांची गर्दी असते.

कुष्ठरोग हा बरा होणारा आजार असून त्याबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत, असे डॉक्टरांचे मत आहे. 

कोणत्याही पाण्यात आंघोळ केल्याने रोग बरा होत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. 

अशा कोणत्याही पाण्याला वैद्यकशास्त्र मान्यता देत नाही, असे डॉक्टर अरुण पावडे सांगतात. 

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here