नोकरी सोडून 'तो' सांभाळतोय गोवंश!
हिंदू धर्मामध्ये गाईला कामधेनू मानलं जातं आणि तिची पूजा केली जाते.
गोपालन, गोसंगोपन, गोरक्षण याला धार्मिक महत्त्व आहे.
अलिकडच्या काळात विविध कारणांनी देशी गोवंश संकटात आहे.
सांगलीतील एका अवलियानं गोरक्षक कसा असावा याचा वस्तुपाठच घालून दिला आहे.
विश्वनाथ गणपती पाटील उर्फ बंडू पाटील यांनी सरकारी नोकरी सोडून गोसंगोपन सुरू केले आहे.
तासगाव तालुक्यातील कुमठे हे बंडू पाटील यांचे गाव आहे.
भटक्या, भाकड, वृद्ध, बेवारस गाईंचे हाल पाहून त्यांनी एसटीतील नोकरीचा राजीनामा दिला.
कुमठे गावापासून अडीच किलोमीटर लांब वडिलोपार्जित शेतीत गायींसाठी गोठा तयार केला.
गेल्या 15 वर्षांपासून ते गोसंगोपन करत असून देशी गोवंशाचे संवर्धन हाच हेतू आहे.
पन्नाशी पार केलेलेल बंडू पाटील 'माझं आयुष्यच गाईंसाठी दान केलं आहे,' असं सांगतात.
पाटील यांच्या निर्पेक्ष गोसंगोपन कार्याचं कौतुक होत असून मदतीचा हातही दिला जातोय.
गाईंना चाऱ्या पाण्याची समस्या निर्माण होत असून मदतीचे आवाहन केले आहे.
वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!
Click Here