मोराला लागलाय माणसांचा लळा!

माणूस आणि पशु-पक्ष्यांच्या मैत्रीची काही उदाहरणे आपल्या पाहण्यात असतील.

सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात एका मयूर राजाची माणसाशी दोस्ती झाली आहे. 

शिराळा तालुक्यातील वारणावतीचे पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांच्या अंगणात रोज मोर येतोय. 

आत्तार यांचे बंधू सल्लाउद्दीन व वहिनी शबनम आत्तार या दररोज पक्ष्यांना चारा-पाणी देत असतात. 

मोराला त्याची सवय झाली असून तो रोज सकाळ, संध्याकाळ अंगणात येतो. 

ज्या दिवशी अंगणामध्ये धान्य दिसत नाही त्या दिवशी मोर त्यांच्या घरावर जाऊन ओरडतो. 

मोराचा केकारव ऐकायला मिळाल्यावर तो आल्याची सर्वांना जाणीव होते. 

अन्नपाण्याची तजवीज झाली की मोर ते ग्रहण करून आल्यापावली परत जातो. 

चांदोली हा निसर्गरम्य परिसर असून येथे जवळच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. 

पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत.

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here