जलकुंडात उभे आहे कंकालेश्वर मंदिर

बीड शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखलं जातं. 

बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावर ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर आहे. 

चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर 11 ते 12 शतकात बांधले, असं इतिहासकार सांगतात. 

कंकालेश्वर मंदिर बांधण्यासाठी परिसरातीलच दगडांचा वापर करण्यात आला. 

बाजूला खड्डा निर्माण झाल्यानं हे मंदिर कृत्रिमरित्या जलकुंडात उभे आहे. 

कंकालेश्वर मंदिर हे स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना मानलं जातं. 

कंकालेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी कुठलंही बुकिंग अथवा तिकीट नाही. 

मंदिरामध्ये रोज प्रसाद तर महाशिवरात्री, श्रावण महिन्यात महाप्रसाद केला जातो. 

कंकालेश्वर मंदिर हे सकाळी पाचच्या सुमारास उघडते व संध्याकाळी 9 वाजता बंद होते.

कंकालेश्वर मंदिराच्या जवळ पर्यटनासाठी इतरही ठिकाणे आहेत. 

मंदिरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर दीपमाळ आणि खंडोबाचे मंदिर आहे. 

वर्दीतील फोटोग्राफरची कमाल!

Click Here