महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे.
नुकतेच पेंचमध्ये तीन दिवसीय उन्हाळी पक्षी सर्वेक्षण करण्यात आले असून यात तब्बल 220 प्रजातींची नोंद झाली आहे.
यामध्ये मलबार पाईड हॉर्नबिल्स, ग्रे हेडेड फिश ईगल, लॉग बिल्ड व्हल्चर, ब्लॅक ईंगल आदी पक्षांचा समावेश आहे.
ग्रेट थिकनी, ऑरेंज हेडेड थ्रैश, व्हाइट रम्पड गिधाड, स्पॉट बेलीड ईगल आऊल आदी पक्षीही आढळले.
जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणात 226 पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली होती.
तीनसा इकॉलॉजिकल फाउंडेशनच्या सहकार्याने या उपक्रमात 11 राज्यांतील 70 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
सिटीझन सायन्स मॉडेलच्या आधारे विविध मोसमात पक्ष्यांची विविधता व घनता अभ्यासली जाते.
पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सहभागातून असे सर्वेक्षण केले जाते.
अलिकडे भारतातही विविध जैवविविधता सर्वेक्षणांद्वारे पक्षांविषयी माहितीचे संकलन होत आहे.
सर्वेक्षणातील अहवाल तीनसा चमू आणि पेंच व्याघ्र प्रकल्प प्रकाशित करणार आहे. (फोटो: श्रीकांत ढोबळे)
वाघांच्या संख्येबाबत आली Good News!
Click Here