सतत लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करून अनेकांना डोळ्यांशी निगडीत समस्या जाणवू लागतात. वाढत्या वयासोबत दृष्टी दोषाचा त्रास सुरू होतो.
अनेकवेळा चुकीची जीवनशैली, पौष्टिक आहार नसणं, सतत गॅजेट्सवर डोळे खिळून राहिल्याने पाहण्याची क्षमता क्षीण होऊ लागते.
कमी दिसणं, धूसर दिसणं, कोरडे डोळे, डोळ्यांची जळजळ होणं, डोळ्यात पाणी येणं, डोळे दुखणं, डोळ्यांच्या आसपास सूज येणं यामुळे लोकं त्रासून जातात.
वाढत्या वयासोबत दिसण्याची क्षमता किंवा व्हिजन लॉस (Vision loss) ही सामान्य बाब आहे. पण कमी वयातच या समस्या होणं ही गोष्ट योग्य नाही.
आजकाल लोकांच्या हातात रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी झोपून उठताच मोबाईल असतो. मग ते ऑफिसच्या कामासाठी पुन्हा लॅपटॉपसमोर बसतात
डोळ्यांची नीट काळजी न घेतल्यास डोळ्यांच्या समस्या जाणवणं साहजिक आहे. वाढत्या वयासोबत व्हिजन लॉस होऊ नये याकरता काही गोष्टी करण्यास तुम्ही सुरूवात करा.
डोळे निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेण्यास सुरूवात करा. यामध्ये हिरव्यागार भाज्या आणि मासे यासारखे अँटिऑक्सिडंट्सयुक्त खाद्यपदार्थ आहारात सामील करा.
व्हिटॅमीन ए आणि सी युक्त पदार्थ, विशेषतः चरबीयुक्त मासे जसं सालोमन खा. यामध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असलेलं ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं
बुबुळाच्या आजूबाजूचा भाग पांढऱ्याऐवजी पिवळा दिसत असेल तर यकृत म्हणजेच लिव्हरशी संबंधित आजार वाढत असल्याचे संकेत यातून मिळत असतात.
तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुम्हाला आपोआपच डोळ्यांच्या आरोग्यात फरक दिसून येईल. तुम्ही निरोगी दिसाल. घरी आणि ऑफिसच्या ठिकाणी चांगलं परफॉर्म कराल.
डोळे निरोगी राहण्यासाठी बाहेर असताना चांगल्या क्वालिटीचे सनग्लासेस म्हणजे गॉगल वापरणं. यामुळे डोळ्याचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण होतं.
काही जणांना वारंवार डोळ्यांना हात लावणं किंवा डोळे चोळण्याची सवय असते. जेव्हाजेव्हा डोळ्यांना हात लावायचा असेल तेव्हा ते स्वच्छ धुतलेले असावेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here