किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

 घरातील स्वयंपाकघर हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. येथूनच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले किंवा खराब होण्याची शक्यता असते.

स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे थोडेसे दुर्लक्षही आरोग्य बिघडवू शकते. घरातील अधिक लोकांची तब्येत बिघडते, तेव्हा कुटुंबाची आर्थिक स्थितीही खराब होते. 


आम्ही तुम्हाला अशा काही वास्तु टिप्स सांगणार आहोत, ज्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यापूर्वी लक्षात ठेवल्या पाहिजेत.


पुरुष किंवा महिलांनी जेवण बनवायला घेण्यापूर्वी आंघोळ करावी. आंघोळ केल्याशिवाय अन्न शिजवणं चांगलं मानलं जात नाही.


रागाच्या भरात जेवण कधीही बनवू नये. स्वयंपाक करताना तुमचे मन शांत आणि संयमित ठेवा. त्यामुळे अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते.


स्वयंपाक केल्यानंतर, स्वयंपाकघर व्यवस्थित स्वच्छ करा, स्वयंपाकघरात खरखटी भांडी तशीच ठेवू नका. अस्वच्छ, धुळीत जेवण बनवायला घेऊ नका.

किचनमध्ये डस्टबिन कधीही ठेवू नये. पाणी आणि गॅस शेगडी/स्टोव्ह जवळ ठेवणे चांगले नाही, यामुळे वास्तुदोष देखील होऊ शकतो.

याशिवाय स्वयंपाकघरात देव्हारा बनवू नये. हे देखील चांगले नाही. तसेच किचनशेजारी बाथरूम आणि शौचालय असणंही योग्य नाही.


गॅस स्टोव्ह खिडकीखाली असू नये. यामुळे एक प्रकारे वास्तुदोषही निर्माण होऊ शकतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला जेवणाचे ताट द्याल तेव्हा ते दोन्ही हातांनी धरावे.

एका हाताने ताट दिल्याने त्यात भूत-आत्मा वास करतो, असे मानले जाते. याशिवाय जेव्हा तुम्ही अन्न बनवाल तेंव्हा प्रथम ते अग्निदेवाला अर्पण करावं.

सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.

झाडूच्या या उपायांनी घरात लक्ष्मी राहते

Heading 3

Click Here