जगात चहाप्रेमी आणि कॉफी प्रेमी अशा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. चहा-कॉफीचं व्यसन ड्रग्जप्रमाणे असतं.
या पेयांची सवय असणाऱ्या व्यक्तीची तल्लफ भागली नाही, तर प्रसंगी डोक्यात तीव्र वेदना होऊ लागतात. तसंच अशा व्यक्ती चिडचिड्या होतात.
एक कप गरम चहा हा कोणत्याही औषधापेक्षा कमी नसल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
चहामुळे तणाव तर कमी होतोच; पण त्यासोबत शरीर अनेक आजारांशी लढण्यास सक्षम होतं, असा काही संशोधनांचा दावा आहे.
चहाच्या पानात अनेक अॅंटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीरातलं रक्त स्वच्छ होतं आणि कोणत्याही प्रकारची सूजदेखील कमी होते.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्ती त्यांच्या आहारात चहाचा समावेश करतात, त्या दीर्घ काळ आणि निरोगी आयुष्य जगतात.
चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक असतात. ते ब्लॅक, ग्रीन आणि हर्बल चहामध्ये आढळतात. त्यामुळेच माणसाला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकतं, असं अमेरिकेतील टी कौन्सिलनं म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियात केलेल्या संशोधनात असं आढळून आलं, की ज्या व्यक्ती दिवसातून एक ते पाच कप चहा पितात त्यांना डिमेन्शियाचा अर्थात स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो.
एक कप चहा घेतल्यास अनेकांना अल्पावधीतच तणावापासून मुक्ती मिळते आणि ऊर्जा जाणवते. चहा प्यायल्यानंतर शरीरात अचानक शक्ती येते.
रोज एक कप चहा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच अल्पवयात मृत्यूच्या घटनांमध्ये 1.5 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचंदेखील दिसून आलं.
चहामध्ये आढळणारा फ्लेव्होनॉइड हा घटक कॅन्सरसारख्या (Cancer) आजाराशी लढण्यास मदत करतो, असं प्रयोगादरम्यान दिसून आलं आहे.
`एक कप चहा माणसाला अनेक प्रकारे निरोगी राहण्यास मदत करतो,` असं अमेरिकेतल्या बोस्टनमधल्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीचे डॉ. जेफ्री ब्लूमबर्ग यांनी सांगितलं.
अतिशय गरम चहा घेणं टाळावं. खूप गरम चहा प्यायल्यास अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे चहा थोडा थंड करून पिणं योग्य आहे, असं ब्लूमबर्ग सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here