उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं?

आपलं आरोग्य चांगल ठेवायचं असेल तर दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढं पाणी पिणं गरजेचं आहे.

पाणी शरीरातल्या विषारी घटकांना बाहेर फेकते, त्यामुळे त्याचे सेवन करण अतिशय गरजेचं आहे.

परंतु हेच पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायलं, तर नुकसान होतं.

अनेकजण पाणी उभं राहून पितात पण असे करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

उभ्याने आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.

उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पाणी पोटात जाते. त्यामुळे अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब पडून पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.

उभं राहून पाणी पिल्याने अन्न पचन प्रक्रिया सुलभ होत नाही.

उभे राहून पाणी प्यायल्यास पाणी वेगाने वाहून अन्ननलिकेत वाहून गेल्याने किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो.

उभ्याने पाणी प्यायल्याने पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो.

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here