कतरिनाच्या भावी जाऊबाईच मराठी कनेक्शन!

राजकीय कुटुंबातून आलेल्या शर्वरीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शर्वरी ही महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध राजकारण्याची नात असून तिचे आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. 

शर्वरी ही शेवसेना नेते व  माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

 शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत.

शर्वरी 'बंटी और बबली 2' च्या आधीपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. खरे तर तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली.

शर्वरीनं 'प्यार का पंचनामा 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

शर्वरी वाघ ही विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलची जवळची मैत्रिण आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नालाही शर्वरीही उपस्थित होती. 

तेव्हापासून शर्वरी सनीला डेट करत असल्याचे व  ही दोघं लग्न करणार असल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!

Heading 3

Click Here