कितवी शिकलीय शाहरुखची लेक?

शाहरुखची मुलगी सुहाना खानचा आज वाढदिवस आहे. तिने 23 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

सुहाना खानने अजून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं नसलं तरी ती कायमच चर्चेत असते.

सुहाना खानचा जन्म 22 मे 2000 रोजी मुंबईत झाला होता.

ती मुंबईत मोठी झाली आणि तिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले.

सुहाना शाळेत खेळात खूप चांगली विद्यार्थिनी होती आणि तिचा आवडता खेळ फुटबॉल होता.

शालेय शिक्षण पूर्ण करून ती उच्च शिक्षणासाठी बाहेर पडली. तिने लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

ग्रॅज्युएशनच्या काळात तिने ड्रामा क्लबमध्येही सहभाग घेतला आणि त्यासाठी तिला रसेल कपही मिळाला आहे.

ग्रॅज्युएशननंतर, ती अभिनय आणि नाटक शिकण्यासाठी न्यूयॉर्क विद्यापीठात गेली. त्यांनी तिथे अनेक थिएटर शोही केले आहेत.

सुहाना फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'द आर्चीज' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

नवऱ्यापेक्षा 27 वर्षांनी लहान आहे ही मराठी अभिनेत्री!

Heading 3

Click Here