राजेश खन्ना यांचे खरे नाव माहिती आहे का?

राजेश खन्ना यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 

राजेश खन्ना यांच्या डोळ्यांची पापणी हलवणे आणि मान झुकवण्याच्या लकबीचे लोक दिवाने होते. 

राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील खन्ना गावात झाला होता. 

पण तुम्हाला माहिती आहे का या सुपरस्टारचं खऱं नाव राजेश खन्ना नव्हतं. एका व्यक्तीच्या सांगण्यावरून राजेश खन्ना असं नाव त्यांनी ठेवलं होतं. 

राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन कुमार होते. त्यांना त्यांच्या एका नातेवाईकाने दत्तक घेतले होते. 

आपल्या काकांच्या म्हणण्यावर त्यांनी आपले नाव बदलून राजेश खन्ना केले.

 1969 ते 1975 या कालावधीत राजेश यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. 

. याकाळात अनेक आईवडिलांनी आपल्या मुलाचे नाव राजेश ठेवले होते.

या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!

Heading 3

Click Here