लक्ष्मी अग्रवाल कोणासोबत होती रिलेशनशिपमध्ये?
मेघना गुलझार दिग्दर्शित छपाक या सिनेमामुळं लक्ष्मी अग्रवालव सर्वांना समजली.
लक्ष्मीचा जन्म नवी दिल्ली येथे एका गरीब कुटुंबात झाला. लक्ष्मी 15 वर्षांची होती तेव्हा तिच्या शेजारी काम करणाऱ्या नईम खानने तिला प्रोपज केलं.
32 वर्षांच्या नईमला तिने त्याला नकार दिला म्हणून त्याने त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने लक्ष्मीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं.
तेव्हा अरुण सिंग नावाच्या एका व्यक्तीने तिला रूग्णालयात दाखला केलं, तिथेच तिच्यावर उपचार झाले.
हल्ल्यानंतर चार दिवसांनी नईम खानला अटक झाली, परंतु एका महिन्यानंतर त्याला जामीन मिळाला.
लक्ष्मी अग्रवाल ही सामाजिक कार्यकर्ते आलोक दीक्षित यांच्याशी रिलेशनशिपमध्ये होती. मात्र 2015 पासून ती अलोकपासून वेगळी राहत आहे.
एका मुलाखतीमध्ये लक्ष्मी म्हणाली होती की, आम्ही लग्न न करता लिव्ह-इनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
आमच्या लग्नात लोकांनी यावे आणि माझ्या लूकवर टिप्पणी द्यावी अशी आमची इच्छा नाही. या दोघांना एक मुलगी आहे. दोघंही सध्या वेगवेगळे राहतात.
लक्ष्मीवर ऍसिड हल्ला झाला असला तरी तिनं हिम्मत हारली नाही. तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
या चित्रपटात एकत्र झळकणार रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड्स!
Heading 3
Click Here