लेकीसाठी अनुष्का शर्माने घेतलाय मोठा निर्णय!
अभिनेत्री अनुष्का शर्माने फ्रान्समध्ये आयोजित 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये पदार्पण केले आहे.
अभिनेत्रीची एक मुलाखतही चर्चेत आली आहे ज्यामध्ये तिने मुलीविषयी भाष्य केलं आहे.
अनुष्काने 2021 मध्ये मुलगी वामिकाचे स्वागत केले. मुलीच्या जन्मानंतर अनुष्का चित्रपटांमधून दूर आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने आई झाल्यानंतर तिच्या प्रायोरिटी बदलल्या असल्याचं सांगितलं.
अनुष्का म्हणाली, 'माझ्या मुलीला या वयात माझी जास्त गरज आहे हे मला माहीत आहे.'
'विराट एक चांगला पिता आहे. आई आणि वडील दोघेही मुलीची काळजी घेतो, पण वाढत्या वयात मुलीला आईची गरज असते.' असं ती म्हणाली.
आता अनुष्काने वर्षभरात एकच चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे.
'मला माझ्या कुटुंबाला आणि मुलीला वेळ द्यायचा आहे.' असं कारण तिने सांगितलं आहे.
अनुष्का लवकरच 'चकडा एक्सप्रेस' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ती शेवटची 2018 मध्ये शाहरुख खानच्या 'झिरो' चित्रपटात दिसली होती.
महेश बाबूच्या लेकीची मोठी कामगिरी!
Heading 3
Click Here