घर अंगणात कोणती झाडं लावणं शुभ?

हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पती पूजनीय मानल्या जातात. तुळशी, वड, पिंपळ, केळी यांसारख्या अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवदेवता वास करतात, असे मानले जाते.

झाडे लावल्याने वातावरण शुद्ध तर राहतेच शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात. पण, घराशेजारी, दारात लावण्यासाठी झाडे आणि रोपांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे.

सर्व झाडे घराजवळ लावणे शुभ मानले जात नाही. काही झाडे घराजवळ किंवा अंगणात लावणे टाळावे.

अंगणात बेलाचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते. बेलपत्र हे शिवालाही प्रिय आहे. शिवाला बेलाची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे.

अश्वगंधा - घरासाठी अश्वगंधा शुभ मानली जाते. अंगणात अश्वगंधा लावल्याने वास्तुदोष दूर होऊन सुख-समृद्धी येते.

आवळा वृक्ष - आवळा वृक्षावर भगवान विष्णूचा वास असल्याचे सांगितले जाते. घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला हे झाड लावल्याने घरात समृद्धी येते.

तुळशी, अशोक, नारळ, जास्वंद, केळी यांसारखी झाडे आणि रोपे देखील तुम्ही अंगणात लावू शकता. या झाडांना शुभ मानले जाते.

अंगणामध्ये चेरीचे झाड लावणे अशुभ मानले जाते. या झाडांमुळे आर्थिक त्रास होतो, त्यामुळे घराजवळ चुकूनही चेरीचे झाड लावू नका.

चिंचेचे झाडदेखील घरासाठी शुभ मानले जात नाही. या झाडावर वाईट शक्तींचा वास असल्याचे सांगितले जाते.

चिंचेचे झाड असेल तर ते कापू नका, तर त्याच्या आजूबाजूला तुळस, हळद, कडुनिंब किंवा अशोकाचे रोप लावा. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम कमी होतो.

ही झाडे कलह आणि संकटांना कारणीभूत ठरतात - मेहंदी, रेशीम, ताड आणि कापसाची झाडे घर किंवा घराच्या आसपास लावू नयेत.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here