हिंदू धर्मात पूजा आणि शुभ कार्याच्या वेळी कलश ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार कलश सुख, समृद्धी, वैभव आणि शुभतेचा प्रतीक मानला जातो.
पूजा करताना प्रथम कलशाची स्थापना करावी. कलश स्थापना घरी किंवा मंदिरात आयोजित विधी आणि पूजा पाठांमध्ये प्रथम केली जाते.
हिंदू धर्मात कलश हा विश्व, विराट, ब्रह्मा आणि पृथ्वीचे प्रतीक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवतांची शक्ती त्यात सामावलेली आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, कलशाच्या मुखात भगवान विष्णू, कंठात भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत.
दैवी मातृशक्ती कलशाच्या मध्यभागी राहते. कलशात भरलेले पाणी हे थंड, स्वच्छ आणि शुद्ध असावे.
कलश स्थापनेसाठी नेहमी फक्त सोने, चांदी, तांबे किंवा मातीची भांडी वापरावीत. लोखंडी कलश कधीही पूजेसाठी वापरू नये.
कलशाची स्थापना करताना दिशेचे ज्ञान असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. कलशाची स्थापना नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला करावी.
कलशाची स्थापना करताना सर्वप्रथम ती जागा पूर्णपणे स्वच्छ करावी. त्यानंतर त्या ठिकाणी गंगाजल शिंपडा. त्यानंतरच कलशाची स्थापना करावी.
कलश ठेवण्यासाठी मातीची वेदी बनवावी आणि हळदीने अष्टकोनी बनवावी. कलशात पंचपल्लव, पाणी, दुर्वा, चंदन, पंचामृत, सुपारी, हळद, अक्षत, नाणे, लवंग, वेलची, सुपारी टाकून त्याची प्रतिष्ठापना करावी.
कलश बसवल्यानंतर त्यावर लाल किंवा पिवळे स्वस्तिक बनवावे. कलशावर बनवलेले हे स्वस्तिक चिन्ह चार युगांचे प्रतीक मानले जाते.
कलशाची स्थापना करताना जव किंवा गहू कलशाखाली ठेवावेत आणि कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून नारळ स्थापित करावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here