वटपौर्णिमा: या शुभ मुहूर्तांवर करा वडपूजा

वट सावित्री पौर्णिमा व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. वट सावित्री पौर्णिमा व्रताला वटपौर्णिमा असेही म्हणतात.

यंदाच्या वट सावित्री पौर्णिमेला 3 शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळ आणि दुपारची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

पंचांगानुसार या वर्षी शनिवार, 3 जून रोजी सकाळी 11.16 वाजता ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू होत आहे..

 वट सावित्री पौर्णिमेचे व्रत शनिवार, 3 जून रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी वटवृक्ष, सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाईल.

या दिवशी सकाळपासून शिवयोग तयार होत असून तो दुपारी 02:48 पर्यंत राहील. तप आणि ध्यानासाठी शिवयोग सर्वोत्तम मानला जातो.

वट सावित्री पौर्णिमा व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 07:07 ते 08:51 पर्यंत आहे, हा शुभ काळ आहे.

यानंतर दुपारी पूजेचा शुभ मुहूर्त 12:19 ते 05:31 पर्यंत आहे. यामध्येही लाभ-प्रगतीचा मुहूर्त 02:03 ते 03:47 पर्यंत आहे.

वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी 3 जून रोजी सकाळी 11:16 ते रात्री 10:17 पर्यंत भद्रकाळ आहे. मात्र, स्वर्ग भद्र असल्यानं त्याचा परिणाम होणार नाही.

वट सावित्री पौर्णिमेलाही उपवास केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात 

वटवृक्ष, सावित्री आणि सत्यवान यांची पूजा करतात, ज्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते, असे मानले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here