सूर्यास्तानंतर ही कामं करणं अशुभ मानलं जातं

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात काही कामं संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर न करण्याचा सल्ला दिला जातो.

सूर्यास्तानंतर काही गोष्टी केल्यामुळं घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा कोपते, असे मानले जाते

सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नयेत. एवढेच नाही तर दाढी करणे देखील टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. असे केल्याने घरावरील कर्ज वाढते असे मानले जाते.

सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये. असे म्हणतात की सूर्यास्तानंतर झाडे आणि वृक्षदेखील झोपतात.

सूर्यास्तानंतर कपडे धुण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते.

सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे. उघडे राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, असे मानले जाते.

दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र हा धन आणि वैभवाचा प्रदाता मानला जातो. अशा वेळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर दही दान केल्याने सुख-समृद्धी दूर होते.

असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घर झाडू नये किंवा साफसफाई करू नये. असे केल्याने धनहानी होऊ शकते.

सूर्यास्तानंतर लगेच झोपू नये, म्हणजे सूर्यास्तानंतरच्या संधी प्रकाशामध्ये. यावेळी लैंगिक संबंध देखील निषिद्ध मानले जातात. असे केल्याने पती-पत्नीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here