स्वच्छतेसाठी वापरला जाणारा झाडू ही एक अशी वस्तू आहे, जी सर्वांच्याच घरात आढळते. घर स्वच्छ करण्यासाठी झाडूचा वापर केला जातो.
झाडूला लक्ष्मीचं रूपदेखील म्हटलं जातं. घर झाडल्यामुळे घरातली घाण बाहेर टाकली जाते आणि स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती घरात येते.
वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी झाडूचा महत्त्वाचा वाटा असतो.
नवीन झाडूची खरेदी करताना ती नेहमी शनिवारीच करावी. कारण शनिवारी घरात नवीन झाडू वापरणं खूप शुभ मानलं जातं.
तुम्ही नवं घर घेतलं असेल आणि तुम्हाला त्या घरामध्ये राहायला जायचं असेल तर तुम्ही नवीन घरात नवीन झाडू झाडू घ्यावा.
घराची साफसफाई करण्याचा झाडू आणि देवघराचा झाडू कायम वेगवेगळा ठेवावा.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैर्ऋत्य दिशेला झाडू ठेवणं सर्वांत योग्य असतं.
हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवावा, जिथे तो कोणाला दिसणार नाही. झाडू कधीही स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये.
घरात झाडू कधीही उभा ठेवू नये. तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, की झाडू कधीही जाळू नये.
रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाजवळ झाडू ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here