कुंडलीत बुध ग्रह कमजोर किंवा अशक्त स्थितीत असतो, अशुभ ग्रहांसोबत असतो, तेव्हा बुध दोष निर्माण होतो. बुध दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक विचित्र समस्या येऊ लागतात.
बुध दोषामुळे व्यक्तीला पैशाची चणचण भासते, गरिबीची स्थिती निर्माण होऊ शकते. व्यक्तीचा आत्मविश्वास ढासळतो, त्याला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्सचा त्रास होऊ शकतो
तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी बुध दोषाची लक्षणे आणि बुध दोषावरील उपायांची माहिती दिली आहे.
1. कुंडलीत बुध अशुभ असतो तेव्हा व्यक्तीच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याला आपलं म्हणणं स्पष्ट बोलता येत नाही. त्याच्यात वाणी दोष निर्माण होतो.
बुध दोषामुळे माणूस स्वतःला आणि इतरांच्या तुलनेत कमी लेखू लागतो. त्याला त्याच्या क्षमतेवर विश्वास राहत नाही. व्यक्तीची निर्णयक्षमता किंवा तर्कशक्ती कमकुवत होते.
बुध दोषामुळे त्वचारोग होतो. दात कमकुवत होतात आणि वास घेण्याची क्षमताही कमी होते. बुधाच्या कमकुवतपणामुळे खाज, कावीळ, तोतरेपणा, टायफॉइड इ. असे आजारही होतात.
त्या व्यक्तीचे करिअर खराब होत जाते. व्यवसाय, नोकरी, प्रवास आणि शिक्षणात कमतरता निर्माण होते. या क्षेत्रांमध्ये व्यक्ती प्रगती करू शकत नाही.
बुध दोषामुळे धनहानी होते. कर्ज वाढते, चेहरा तेजस्वीहीन होतो. व्यक्ती भ्रमात राहू लागते. बहीण, आई, मावशी यांच्याशी संबंध बिघडतात
बुध दोषापासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा आणि साधा मार्ग म्हणजे तुमच्या घरी रुंद पानांची रोपे लावणे. याशिवाय घराच्या मुख्य दरवाजावर पंचपल्लवचे तोरण लावू शकता
बुध दोष असेल तर बुधवारी व्रत ठेवून गणेशाची पूजा करावी. याने बुध दोष दूर होईल. या दिवशी तुम्ही बुध ग्रहाच्या बीज मंत्राचाही जप करावा.
बुध दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे घाला. याशिवाय हिरव्या मूग डाळीची खीर खावी. यामुळे बुध ग्रहही बलवान होईल
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here