वेळ दाखवण्यासोबतच घराच्या सौंदर्यात आणि घराच्या वास्तुशास्त्रामध्येही घड्याळ महत्त्वाची भूमिका बजावते.
बहुतांशी लोक घरामध्ये भिंतीवर घड्याळ लावतात आणि ते अशा ठिकाणी लावलं जातं जिथं आपल्याला वेळ दिसणे सोपे जाईल.
सोप्या शब्दात सांगायचे तर, आपण आपल्या सोयीनुसार घरात कोणत्याही भिंतीवर घड्याळ लावतो.
घरामध्ये घड्याळ कोणत्या दिशेला असावे, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये. याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
घड्याळ पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी आणि प्रगती वाढते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर घड्याळ कधीही लावू नये. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो.
घरात केशरी आणि हिरव्या रंगाचे घड्याळ लावू नये. ही दोन्ही रंगीत घड्याळे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, असे मानले जाते.
याशिवाय घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. तसेच, घड्याळावर धूळ बसू देऊ नये.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दिवाणखान्यात चौकोनी आकाराचे घड्याळ लावणे फायदेशीर ठरते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here