राखी बांधण्यासाठी यंदा रात्रीचा मुहूर्त का?

दरवर्षी श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. राखी बांधताना भद्रकाळ पाहिला जातो.

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळाच्या वेळेत बहिणी भावाला राखी बांधत नाहीत. भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते.

या वर्षी 2023 मध्ये रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची छाया आहे. ज्या वेळेपासून श्रावण पौर्णिमा तिथी सुरू होते, त्याच वेळेपासून भद्रकाळही सुरू होत आहे.

अशा परिस्थितीत रक्षाबंधन कधी साजरे करावे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? याविषयी केंद्रीय संस्कृत विद्यापीठ पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्रा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.

या वर्षी 30 ऑगस्टला रक्षाबंधनावर भद्रकाळाची छाया आहे. रक्षाबंधन दिवशी भद्रकाळ सकाळी 10.58 वाजता सुरू होत असून रात्री 09.01 पर्यंत आहे

ही भद्रा पृथ्वी जगताची आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 30 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रात्री 09:01 नंतर आहे.

भद्रकाळामुळे दोन दिवस रक्षाबंधन  साजरे केले जाऊ शकते. या वर्षी 2023 मध्ये 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट असे दोन दिवस रक्षाबंधन साजरे करता येईल.

31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करायचे आहे त्यांच्यासाठी मुहूर्त फक्त सकाळी 07:05 पर्यंत आहे. त्या दिवशी अमृत-सर्वोत्तम मुहूर्त पहाटे 05:42 ते 07:23 पर्यंत आहे.

यंदा रक्षाबंधन बुधवार, 30 ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल. कारण पौर्णिमा 31 ऑगस्टच्या सकाळीच संपणार आहे. 31 तारखेला सकाळी लवकर राखी बांधता येईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here