घरातील या 8 गोष्टी असतात देवी लक्ष्मीचं प्रतिक

ऐश्वर्य, वैभव, सुख, संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असल्याचे मानले जाते.

काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो, त्यामुळे पैसा, संपत्ती यामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते. 

घरातील काही गोष्टी असतात, ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात.

देवी लक्ष्मी कोणत्या गोष्टींमध्ये निवास करते, याविषयी तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

श्रीयंत्र - श्रीयंत्रात माता महालक्ष्मी वास करते, असे मानले जाते. ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट, दारिद्र्य आहे किंवा जे श्रीमंत आहेत, तेही धनवृद्धीसाठी श्रीयंत्राची पूजा करू शकतात.

शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला. यामुळे ज्या घरात शंखपूजा केली जाते, तिथे लक्ष्मीचा वास असतो.

घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मीचे गृहलक्ष्मी रूप वास करते. घराच्या सुख-समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात मदत होते. रात्रीच्या वेळी झाडू नये.

श्रीफळ - श्री चा दुसरा अर्थ लक्ष्मी. जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा कराल तेव्हा तिला फळे अर्पण करा. पूजेच्या ठिकाणीही श्रीफळ ठेवावे.

कमळाचे फूल - धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलात वास करते. ती फक्त कमळावर बसते. शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे.

पिंपळाचे झाड - पिंपळाचे झाड घरात लावले जात नाही, पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकता. पिंपळाच्या मुळांमध्ये लक्ष्मी देवी वास करते.

तुळस - घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावा. त्याची सेवा करा. रोज संध्याकाळी दिवा लावावा. येथे लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचेही मानले जाते.

पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात. यामुळे धन आणि संपत्ती वाढते, असे मानले जाते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here