घरात मोरपंख ठेवणे खूप शुभ मानले जाते. ते घरात ठेवल्यानं नकारात्मक शक्ती नष्ट होतात, मोरपंख आनंदाचे प्रतीक मानले जाते.
मोराचे पिस खूप आकर्षक असते. मोर पाहिल्यावर जसा आनंद मिळतो, त्याचप्रमाणे मोराची पिसे घरात ठेवल्याने आनंद मिळतो, असे मानले जाते.
मोरपंख घरात ठेवल्यानं धनाची कमतरता राहत नाही, त्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुलतो. अनेक घरांमध्ये लोक मोराची पिसे पुष्पगुच्छ म्हणूनही ठेवतात.
घराच्या कोणत्या दिशेला/कोपऱ्यात मोराची पिसे ठेवणे शुभ असते. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊ
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेचे स्वामी सूर्यदेव आणि इंद्रदेव आहेत. यामुळे घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे शुभ असते.
हवे असल्यास आपण वायव्य दिशेलादेखील ठेवू शकता. या दिशेला मोराची पिसे ठेवल्याने अपार संपत्ती निर्माण होते, असे मानले जाते.
कोणाच्या कुंडलीत राहु दोष असेल तर त्यांच्यासाठी मोरपंखासाठी वायव्य दिशा शुभ. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने राहूचे दोष संपतात.
वास्तुशास्त्रानुसार 8 मोराची पिसे बांधून ईशान्य दिशेला भिंतीला लावावित, असे केल्याने वास्तुदोष संपतो.
विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोरपंख ठेवावे. यामुळे मन अभ्यासात गुंतलेले राहते, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवल्याने वैवाहिक जीवनात शांती राहते. यासोबतच आनंदी वातावरण राहते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here