जेवायला बसताना कोणत्या दिशेला तोंड असावं?

महाभारत, विष्णु पुराण, वामन पुराण, स्कंद पुराण, वशिष्ठ आणि पराशर स्मृती यासह अनेक ग्रंथांमध्ये जेवण्याचे नियम सांगितले आहेत.

त्यापैकी आज आम्ही तुम्हाला जेवताना दिशेचे नियम सांगत आहोत, ज्याचे पालन न केल्यास ते अन्न प्रेत किंवा आसुरी होत असल्याचे मानले जाते.

पंडित रामचंद्र जोशी यांच्या मते, जेवताना दिशा लक्षात ठेवली पाहिजे. हातपाय धुतल्यानंतर जेवायला बसताना नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. 

विष्णु पुराणात 'प्रदमुखोदद्मुखो वापि' आणि वसिष्ठ स्मृतीमध्ये 'प्रदमुखान्ननी भुंजीत' असा उल्लेख आहे, म्हणजे भोजन नेहमी पूर्वेकडे  आणि उत्तरेकडे तोंड करून खावे.

दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून अन्न कधीही खाऊ नये. या संदर्भात वामन पुराणात म्हटले आहे की- 'भुञ्जीत नैवेह च दक्षिणामुखो न च प्रतीच्यामभिभोजनीयम्..

 दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नये. असे केल्याने त्यात राक्षसी प्रभाव पडतो. तसेच पश्चिम दिशेला तोंड करून अन्न खाणे रोगाला आमंत्रण देणारे मानले जाते.

जो कोणी डोक्याला वस्त्र गुंडाळून, दक्षिणेकडे तोंड करून व जोडे घालून अन्न खातो, त्याचे सर्व अन्न राक्षसी समजले जाते.

हात-पाय न धुता जो अन्न खातो, दक्षिणेकडे तोंड करून डोक्यावर वस्त्र गुंडाळतो, त्याचे अन्न नेहमी भुते खातात.

पंडित जोशी यांच्या मते, पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढते आणि संपत्तीचा फायदा होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here