धार्मिक गोष्टींमध्ये तुळशीचे महत्त्वाचे पूजनीय स्थान आहे.
हिंदू धर्मात तुम्हाला प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावलेले आढळेल. धार्मिक श्रद्धेनुसार देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते, असे मानले जाते.
तुळशीला एकादशी आणि रविवार सोडून नियमितपणे जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
तुळशीचे दोन प्रकार आहेत, एक राम आणि एक श्यामा. या दोन्हींमधील फरक आणि त्यांचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
रामा तुळशीचा रंग चमकदार आणि हिरवा असतो. या तुळशीची पाने खाल्ल्यावर चवीला थोडी गोड लागतात.
रामा तुळशीला सामान्यतः श्री तुळशी, भाग्यवान तुळशी किंवा उज्ज्वल तुळशी असेही म्हणतात.
श्यामा तुळशीचा रंग जांभळा किंवा जांभळ्या वांग्यासारखा असतो. चवीबद्दल बोलायचे तर ही तुळस रामा तुळशीसारखी गोड लागत नाही.
धार्मिक मान्यतेनुसार शामा तुळशी भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे, असे सांगितले जाते.
हिंदू धर्मात साधारणपणे दोन्ही प्रकारच्या तुळशीची रोपे घरात लावली जातात. पण या दोन्ही पैकी कोणत्या प्रकारची तुळस घरी लावावी?
ज्योतिषी हितेंद्रकुमार शर्मा सांगतात की, घरामध्ये रामा तुळशीची लागवड करणे सर्वोत्तम आहे. ती घरामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते.
श्यामा तुळसही तुम्ही घरी लावू शकता, पण पूजेपेक्षा तिचा उपयोग औषधासाठी जास्त केला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here