हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्ताचे महत्त्व सांगितले आहे. यावेळात झोपेतून उठणे खूप शुभ मानले जाते. वेद आणि पुराणात ब्रह्म मुहूर्तावर ऋषी जागृत होत असत, असा उल्लेख आहे.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठून, स्नान, ध्यान आणि उपासना केल्याने आपली प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते.
या शुभ मुहूर्तावर उठण्याचे अनेक आरोग्य फायदेही सांगण्यात आले आहेत. यामुळे सकाळी ताजी हवा मिळते, ज्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.
ब्रह्म मुहूर्त हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. ज्यामध्ये ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ. म्हणजे देवाचा काळ.
हा मुहूर्त रात्रीच्या शेवटच्या तासात होतो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पहाटे 4 ते साडेपाच ही वेळ ब्रह्म मुहूर्त मानली जाते.
ब्रह्म मुहूर्तावर देव आणि पूर्वज आपल्या घरी येतात. त्यामुळे या मुहूर्तावर झोपेतून उठल्यानं त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि घराची प्रगती होते.
ब्रह्म मुहूर्तावर दररोज उठल्याने शारीरिक शक्ती वाढते. अशा लोकांमध्ये सहनशीलता वाढते. तसेच शक्ती, बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते.
ब्रह्म मुहूर्तावर उठणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. या मुहूर्तावर सकाळी उठल्याने लोक जीवनात अधिक यशस्वी होतात.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तामध्ये केलेले ध्यान आत्मविश्लेषण आणि ब्रह्मज्ञानासाठी सर्वोत्तम आहे. ध्यान करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.
ब्रह्म मुहूर्तावर उठलेल्या व्यक्तीला त्या वेळी वातावरणात असलेली सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे मनात चांगले विचार निर्माण होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here