जर तुमच्या जन्मतारखेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 4, 6 आणि 9 हे अंक असतील; तर सरकारी संस्थेत नोकरी मिळण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी शिस्तप्रिय, मेहनती आणि फोकस्ड असणं आवश्यक आहे. 4 अंकामध्ये हे सर्व गुण दिसून येतात.
4 हा अंक तुम्हाला चांगली नियोजन क्षमता देतो. तुमच्या कामाच्या शैलीत व्यवस्थितपणा, शिस्त आणि व्यवस्थापन कौशल्य आणण्यासाठीही 4 हा अंक मोलाची भूमिका बजावतो.
उच्चपदावर काम करण्यासाठी या व्यक्ती योग्य ठरतात. हे लोक महान रणनीतीकारही बनू शकतात. 4 हा अंक तुम्हाला महत्त्वाकांक्षी आणि व्यावहारिक बनवतो.
6 हा अंक तुम्हाला जबाबदारीची जाणीव आणि दृढ निश्चय पुरवतो. आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.
जन्मतारखेमध्ये 6 अंक असलेल्या व्यक्तींना भरपूर संधी उपलब्ध होतात, तसेच त्या मिळवणेही या व्यक्तींना शक्य होते.
9 हा अंक तुम्हाला खूप कणखर आणि इतरांची काळजी घेणारा बनवतो. जन्मतारखेत 9 अंक असणाऱ्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतर्क आणि हुशार असतात.
बुद्धीचा योग्य वापर कसा करायचा हे 9 अंकांच्या व्यक्तींना चांगल्या प्रकारे जमतं. व्यावसायिक आघाडीवर यश मिळवण्यासाठी, महत्त्वाकांक्षी असण्यासाठी तसेच अधिकार पदावर बसण्यासाठी या गोष्टींची गरज भासते.
तुम्ही सरकारी अधिकारी बनण्याचा विचार करत असाल, आणि तुमच्या जन्मतारखेत वरील अंक नसतील; तर तुम्ही इतर मार्गांनी या अंकांच्या सानिध्यात येण्याचा प्रयत्न करा.
यासाठी तुम्ही वर दिलेले अंक असलेला मोबाईल क्रमांक वापरणं सुरू करू शकता, जेणेकरून या अंकांची ऊर्जा तुमच्या सोबत राहील.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
(सूचना : येथे दिलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here