काय ही साडेसाती मागे लागलीय?.. असं कोणीतरी म्हटलेलं आपण ऐकलं असेल. साडेसाती ही माणसाच्या जीवनातील खराब काळ मानला जातो.
ज्योतिषशास्त्रात, शनीच्या साडेसातीची माहिती दिली आहे. शनीची साडेसाती म्हणजेच 7 वर्षे व्यक्तीला खूप मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
ज्या राशीत शनी निवास करतो त्या राशीवर शनीची साडेसाती सुरू होते आणि एक राशी पुढे आणि एक राशी मागे असते.
एका राशीत शनी अडीच वर्षे राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शनीची साडेसाती तीन वेळा येऊ शकते.
दर 30 वर्षांनी माणसाला शनीच्या साडेसातीला सामोरे जावे लागते. हा काळ त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वात बिकट काळ असू शकतो.
2023 मध्ये मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती आहे. साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी भगवान शिव आणि हनुमानाची उपासना सर्वोत्तम मानली जाते.
शनीची साडेसाती तीन टप्प्यात चालते. दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक मानला जातो. या टप्प्यात, व्यक्तीला अपयश, रोग आणि दुर्दैवं त्रास देतं.
साडेसातीचा त्रास टाळण्यासाठी शनिवारी शनिदेवाचे दर्शन घेणे आणि हनुमान चालिसाचे पठण करणे लाभदायक मानले जाते.
शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिदेवाशी संबंधित तेल, काळे वस्त्र, काळी उडीद आणि काळी घोंगडी दान करावी.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here