तुळशीची पानं तोडताना या चुका टाळा

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे आणि तुळस जवळपास सर्व घरांमध्ये आढळते. तुळशीची नियमित पूजा केली जाते.

तुळशीचे धार्मिक महत्त्व आहेच शिवाय औषधी गुणधर्मामुळे तुळशीचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांवर केला जातो.

धार्मिक शास्त्रांनुसार, दररोज तुळशीच्या रोपाचे दर्शन घेतल्याने आपल्यावरील संकटे दूर होतात आणि त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

पूजेत तुळशीच्या पानांचा भरपूर वापर केला जातो. पण, तुळशीची पाने तोडण्याचेही काही धार्मिक नियम आहेत.

तुळशीच्या पानांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर आपल्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे येऊ शकतात, असे मानले जाते.

आपले जीवन अडचणींपासून दूर ठेवण्यासाठी तुळशीशी संबंधित योग्य नियम आणि परंपरा जाणून घेणे आवश्यक आहे.

आंघोळ केल्याशिवाय तुळशीची पानं कधीही तोडू नयेत. आंघोळ न करता तुळशीच्या रोपाला पाणी घालण्यासही मनाई आहे.

धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार तुळशीची पाने तोडण्यापूर्वी तुळशीमातेची प्रार्थना करावी आणि पाने तोडण्याची परवानगी घ्यावी.

अनेक वेळा लोक तुळशीचे फक्त पान तोडतात. असं करणं चुकीचं आहे. फक्त पान कधीही तोडू नका, पानासोबत फांदीचा पुढचा भाग संपूर्ण तोडा.

तुळशीच्या मंजिरी या सर्व फुलांपेक्षा श्रेष्ठ मानल्या जातात, त्यामुळे मंजिरी तोडताना त्यामध्ये पाने असणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.

- तुळशीची पाने तोडताना ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा की, सूर्यास्तानंतर कधीही पाने तोडू नये. तुळशीची पाने तोडताना नखांचा वापर करू नये. 

विनाकारण तुळशीची पाने तोडणे पाप मानले जाते. नेहमी तुळशीचा वापर धार्मिक कार्यात किंवा कोणत्याही रोगात औषध म्हणून करावा.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here