पुनर्जन्माबद्दल अनेकांना आकर्षण असतं. आत्मा, पुनर्जन्म यांवर अनेकांचा विश्वास असतो. पुनर्जन्म झाला आहे की नाही, याचे संकेत काही गोष्टींवरून दिसतात.
या जन्मातल्या तुमच्याशी संबंधित नसलेल्या आठवणीसुद्धा वारंवार आठवत असतील, स्वप्नात अशा गोष्टी दिसत असतील...
विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल अकल्पनीय आत्मीयता वाटत असेल, तर अशा गोष्टी तुमच्या आत्म्याने अनेक वेळा पुनर्जन्म घेतल्याचे संकेत असू शकतात.
एखादी व्यक्ती अचानक दुसरी भाषा बोलू लागल्याचे प्रकार घडल्याचं अनेकदा तुम्ही ऐकलंही असेल. हा पुनर्जन्म झाल्याचा संकेत असू शकतो.
शरीरावर असणारी जन्मखूणसुद्धा पुनर्जन्माचा संकेत देत असते. ही जन्मखूण कधी कधी पूर्वजन्मातल्या आघाताची शारीरिक खूण मानली जाते.
अनोळखी व्यक्तीबाबत अचानक आत्मीयता वाटू लागते. संबंधित व्यक्तीसोबत स्वतःचे खूपच दृढ संबंध आहेत, असं वाटू लागतं. हादेखील पुनर्जन्माचा संकेत आहे.
एखाद्या गोष्टीबाबत खूप भीती वाटणं, त्याबाबत फोबिया असणं, हेदेखील पुनर्जन्माचा संकेत देत असतं.
अनेक वेळा पुनर्जन्म घेतलेले आत्मे पृथ्वीवरच्या जीवनाला कंटाळलेले/थकलेले असतात. त्यांना आता जन्माचं चक्र पूर्ण करून मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असते.
काहींना अशा ठिकाणांची, व्यक्तींची स्वप्नं पडत असतात, ज्यांना ती या जन्मात कधीच भेटलेली नसतात; पण त्यांना स्वप्नात येणारं ते ठिकाण, व्यक्ती खूप परिचित वाटत असतात.
स्वतःचं वय जास्त वाटू लागतं किंवा एखादी व्यक्ती लहान असतानाही मोठ्या व्यक्तीसारखे वागत असल्याचं जाणवतं, तर हेसुद्धा पुनर्जन्माचे संकेत देते.
एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथे यापूर्वीही आलेलो असल्यासारखं वाटणं, एखादं ठिकाण, संस्कृती किंवा वातावरणाबाबत एक अवर्णनीय आकर्षण, आत्मीयता वाटणं
भूतकाळाबद्दल सहज उपलब्ध नसलेली माहिती मिळवण्याच्या क्षमतेला रेट्रोकॉग्निशन असं म्हणतात. हा पुनर्जन्माचा महत्त्वाचा असा संकेत समजला जातो.
पुनर्जन्म होतो किंवा नाही, याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. अशा वेळी पुनर्जन्माचा फार विचार न करता सध्याचा जन्म अधिक चांगल्या प्रकारे कसा निभावता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवं.
किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?
Click Here