श्रावणात तुळशीचे हे नियम पाळा

अंगणात तुळशी वृंदावन असणं म्हणजे भारतीय संस्कृतीचं लक्षण मानलं जातं. तुम्हाला भारतात बहुतांश घरांपुढे तुळशीचं वृंदावन दिसेल.

रोज तुळशीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात तुळस खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पूजेत या पवित्र वनस्पतीची पानं वापरली जातात.

श्रावणातही इतर दिवशीप्रमाणे तुळशीशी संबंधित नियम-परंपरांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या घरात ही वनस्पती असते त्या घरात भगवान विष्णूंचा वास असतो.

आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नका. असे केल्याने तुळस सुकून जाऊ शकते आणि भगवान विष्णू नाराज होऊन त्यांचा कोप होऊ शकतो.

रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी देऊ नका तसंच तुळशीला स्पर्श करू नका.

- तुळशीचं रोप किचन किंवा बाथरूमजवळ ठेवू नका.

तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेवू नये, झाडू मारू नये, जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर तुळशीच्या आजूबाजूची जागा स्वच्छ कापडाने स्वच्छ करा.

- तुळशीजवळ कोणतंही काटेरी रोप ठेवू नका. त्यामुळे नकारात्मकता वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

तुळशीच्या झाडाची पाने विनाकारण तोडू नका. असे केल्याने अशुभ प्राप्ती होते. आपल्याला आवश्यक तितकी पाने विधीपूर्वक तोडा.

तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना 'महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी। आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।' या मंत्राचा उच्चार करणे आवश्यक आहे

घरात तुळशी असणं हे हिंदू संस्कृतीचा भाग असण्यासोबत तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. त्यामुळे घरी तुळस असेल तर गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here