धातूची अंगठी घातल्यानं फायदा होतो का?

रत्नशास्त्रानुसार मानवी जीवनात रत्नांचे (धातू) विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रातही रत्नांचा उल्लेख आहे.

कुंडलीतील कमजोर ग्रह आणि त्यांची नकारात्मकता दूर करण्यासाठी धातूची अंगठी धारण केली जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने ग्रह आणि कुंडलीनुसार रत्न धारण केले पाहिजे.धारण करण्यापूर्वी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक 

रत्न शास्त्रानुसार नीलम हे शनीचे रत्न मानले जाते. हे रत्न धारण करणार्‍याचे नशीब बदलते, असे म्हणतात.

नीलम धारण केल्यावर लगेचच त्याचा प्रभाव दिसून येतो. या रत्नासोबत माणिक, कोरल आणि पुष्कराज कधीही घालू नयेत.

रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, पन्ना रत्न बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. व्यवसाय आणि नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी पन्ना घातला जाऊ शकतो.

पन्ना रत्न धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि बुद्धिमत्ता देखील वाढते. हे रत्न विशेषतः व्यावसायिक लोकांसाठी मानले जाते.

व्याघ्ररत्न देखील नीलम रत्नाप्रमाणे परिधान करणार्‍यावर फार लवकर प्रभाव दाखवते. असे मानले जाते की आर्थिक चणचण भासणाऱ्या लोकांना वाघ्ररत्न धारण करावे.

विद्यार्थी आणि अभ्यास करणाऱ्यांनी जेड स्टोन घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेड स्टोनमुळे केवळ पैशाचा फायदा होत नाही तर एकाग्रता देखील वाढते.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here