वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना कसा असावा?

वास्तुशास्त्रामध्ये, जिन्याची दिशा खूप महत्त्वाची आहे. कारण, त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होऊ शकते किंवा बिघडू शकते.

अनेकजण घर बांधताना जागा वाचवण्यासाठी जिन्याखाली देव्हारा, स्वयंपाकघर किंवा स्नानगृह बनवतात. पण,

पण वास्तुशास्त्रानुसार हे सर्व कधीही जिन्या खाली बांधू नये. दैनंदिन वापराच्या खोल्या जिन्याच्या खाली कधीही बनवू नयेत.

जिन्याखाली स्टोअररूमसारख्या खोल्या बनवायला हरकत नाही. ज्यांचा रोज वापर होत नाही. 

जिन्याखाली शूज किंवा चप्पल ठेवण्यासाठी कपाट किंवा दागिने-पैसे अशा कोणत्याही मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी तिजोरी किंवा कपाट बनवू नका.

यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच जिन्याखाली कोणताही नळ गळणार नाही, याची विशेष काळजी घ्या.

जिन्याखाली नळ बसवायला हरकत नसली तरी तो गळणार नाही, याची काळजी घ्या. जिना रोज पुसून स्वच्छ करायला हवा, त्याखाली डस्टबिन टेवू नका.

जिन्यावर बल्ब लावल्याची खात्री करा. इथे अंधार ठेवू नका

तसेच प्रकाश जास्त तेजस्वी होणार नाही याची काळजी घ्या. प्रकाश असा असावा की तो शांत आणि हलका असेल.

जिन्याच्या रंगानुसार प्रकाश असावा जो रिफ्लेक्ट होणार नाही. रिफ्लेक्ट प्रकाशामुळे जिन्यावरून जाताना दुखापत होण्याची भीती असते.

घरातील जिना किचन, देव्हारा किंवा स्टोअर रूमच्या दारापासून कधीही सुरू होऊ नये किंवा संपू नये.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

किचनचे हे वास्तू नियम तुम्ही पाळता का?

Click Here