JOIN US
मराठी बातम्या / करिअर / "Board media"CIDCOमध्ये पदवीधरांना मोठी संधी, 25 ते 80 हजार वेतन; कोणाला अर्ज करता येणार?

"Board media"CIDCOमध्ये पदवीधरांना मोठी संधी, 25 ते 80 हजार वेतन; कोणाला अर्ज करता येणार?

CIDCO Recruitment : सिडकोकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ९ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत अर्ज करावेत असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

जाहिरात

test

जाहिरात
News18 मराठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

CIDCOमध्ये पदवीधरांना मोठी संधी, 25 ते 80 हजार वेतन; कोणाला अर्ज करता येणार?

प्रमोद पाटील, मुंबई, 12 डिसेंबर : सिडको महामंडळात रिक्त पदांची भरती प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. ९ डिसेंबरपासून सिडको मंडळातील २३ लेखा लिपिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी उमेदवारांना ८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. सिडकोकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ९ डिसेंबर ते ८ जानेवारी या कालावधीत अर्ज करावेत असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

लेखा लिपिक पदासाठी २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे. दोन तासांची ही परीक्षा असेल. यात मराठी, इंग्रंजी, आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान या प्रत्येक विषयाचे प्रत्येकी ५० प्रश्न असतील. व्यावसायिक ज्ञान विषयात १०० गुण, तर आकलन क्षमता विषयात ५० गुण आणि मराठी, इंग्रजीचे २५ गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

For more Solutions from RBSE Board, please Click here:

सिडकोतील या पदासाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०६२ रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. बी. कॉम, अकांऊंट्समध्ये बी.बी.ए., फायनानशीअल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाऊंटींग, मॅनेजमेंट अकाऊंटींग, ऑडीटींग इत्यादी शैक्षणिक अहर्ता असलेल्या उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

सिडकोमध्ये लेखा लिपिक पदासाठी २३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे इतकी असून राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे. भरतीप्रक्रियेद्वारे निवड होणाऱ्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये इतके वेतन आणि भत्ता मिळणार आहे.  https://ibpsonline.ibps.in/cidcoacjune23/  या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

संबंधित बातम्या

टॉप व्हिडीओज
  • December 8, 2023, 11:36 am IST qwerty video
Testing Lokmat migration for article bottom, static text

फोटो

महत्वाच्या बातम्या