खतरनाक इन्फेक्शनमुळे हातपाय कापण्याची आली वेळ; पण कोलमडून न पडता हिंमतीवर उभा आहे हा इसम
अॅलेक्स लुइस घरी राहून आपल्या मुलांना सांभाळायचे.
अचानक एके दिवशी त्यांची तब्येत बिघडली. तेव्हा त्यांना वाटलं, की सर्दी झाली असावी.
मात्र डॉक्टरांनी सांगितलं, की त्यांना स्ट्रेप ए बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं आहे.
या इन्फेक्शनमुळे त्यांना सेप्टिसेमिया झाला. तो एक प्रकारचा शॉक सिंड्रोम आहे.
त्यामुळे शरीरातून अशी टॉक्सिन्स बाहेर पडतात, की जी शरीराच्या टिश्यूज, त्वचा आणि हाता-पायांवर थेट हल्ला करतात.
खतरनाक इन्फेक्शनमुळे अॅलेक्स यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापावे लागले.
हात-पाय कापल्यानंतर आपलं जीवन पूर्ण बदललं, असं अॅलेक्स यांनी सांगितलं.
हात-पाय नसण्याकडे ते आता सकारात्मक दृष्टीने पाहतात.
अॅलेक्स सांगतात, की पूर्वी जे करण्याची हिंमतही व्हायची नाही, अशा गोष्टीही ते आता सहज करतात.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?