13 वर्षं एकाच बाजुला झुकलेल्या मानेसह त्रास सहन करत होती ही पाकिस्तानी मुलगी, भारतीय डॉक्टरांनी दिलं जीवनदान

पाकिस्तानातली अफशीन गुल ही मुलगी जन्मली, तेव्हा ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच होती. तिला कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती.

आठ महिन्यांची असताना ती पडली. तेव्हा तिच्या डोक्याला, मानेला गंभीर दुखापत झाली.

तेव्हापासून अफशीनची मान तिरपी झाली आणि डोकं एका बाजूला 90 अंशांच्या कोनात कललं. 

13 वर्षं ती याच परिस्थितीत जीवन जगत होती.

तिला सेरेब्रल पाल्सी हा विकारही झाला. त्यामुळे तिची अशी परिस्थिती झाली.

तिच्या कुटुंबीयांना वाटलं, की तिची स्थिती आपोआप सुधारेल; परंतु तसं झालं नाही.

तिच्यावर इलाज करण्याएवढे पैसेही त्यांच्याकडे नव्हते.

क्राउड फंडिंगच्या माध्यमातून 25 लाख रुपये उभे करून तिच्यावर उपचार करण्यात आले. भारतीय डॉक्टर राजगोपालन कृष्णन यांच्या टीमने तिचं ऑपरेशन केलं.

 सर्जरी झाल्यानंतर ती आता आपलं डोकं सरळ करू शकत आहे; मात्र अद्याप आधाराची गरज लागत आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?