माय-लेकी की एकमेकींच्या बहिणी? नावाप्रमाणेच 'Young' आहे ही महिला
आई आणि मुलगीची चेहरेपट्टी, बांधा, अंगकाठी यांमध्ये साधर्म्य असणं यात काही नवल नाही.
स्कॉटलंडमध्ये Edinburgh येथे राहणारी लुइस यंग ही महिला मात्र नावाप्रमाणेच इतकी यंग दिसते, की आपल्याच मुलींशी स्पर्धा करते.
वास्तविक ती आठ मुलींची आई आहे; मात्र मुलींसोबत फोटो काढला, तर ती त्यांची मोठी बहीण वाटते.
लुइस यंग इन्स्टाग्रामवर आपले फोटोज शेअर करते. तिचे स्ट्रायकिंग लुक्स व्हायरल होतात.
इन्स्टाग्रामवर तिचे 8500 फॉलोअर्स असून, तिचे मुलींसोबतचे फोटोज हिट होतात.
लुइस 45 वर्षांची असून, तिला आठ मुली आहेत. त्यापैकी 3 मुलींची लग्नंही झाली आहेत.
आपल्या मुलीच्या लग्नातही लुइस मुलीइतकीच सुंदर दिसत होती.
ती कोणत्याही गेट-अपमध्ये असली, तरी मुलींसोबत पोझ देते तेव्हा स्टाइलमध्ये ती कुठेही त्यांच्यापेक्षा कमी दिसत नाही.
उत्तमोत्तम ड्रेसेस आणि डिझायनर बॅग्जसह जेव्हा माय-लेकी फोटोत दिसतात, तेव्हा सर्व जण लुइसला तारुण्याचं रहस्य विचारतात.
कोणी लुइसच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक करतं, तर कोणी तिची एनर्जी पाहून तिला वंडर वुमन म्हणतं.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?