OMG! या तरुणीला डॉक्टर्सनी बसवला आहे उलटा पाय!

न्यूझीलंडच्या 28 वर्षीय तरुणीचा एक पाय उलटा आहे. तो पाहून सर्व जण आश्चर्यचकित होतात.

जेस क्वीन आठ वर्षांची होती, तेव्हा खेळताना तिचा पाय मोडला होता.

बरा झाल्यानंतरही तो पाय बराच दुखत असे.

डॉक्टरांनी टेस्ट्स केल्यावर कळलं, की तिला हाडांचा कॅन्सर झाला आहे.

कॅन्सर शरीरात वेगाने पसरत असल्याने पाय कापून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला.

हिपपासून पूर्ण पाय कापला असता, तर जेसला कृत्रिम पाय लावता आला नसता.

डॉक्टर्सनी पाय कापला मात्र कॅन्सर असलेल्या पायाचा खालचा भाग पुन्हा लावला.

त्यामुळे आता तो पाय आधाराचं काम करतो. त्याला ती कृत्रिम पाय लावते.

जेस आपल्या जीवनात खूश असून, सर्वांनी शरीरावर प्रेम करण्याचा सल्ला ती देते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?