शुभमंगल सावधान तेही Dog Couple चं! थाटामाटात पार पडला सोहळा
सध्या आपल्याकडे लग्नांचा सीझन आहे; मात्र अमेरिकेत एका सोहळ्यात चक्क कुत्रा-कुत्रीचं लग्न झालंय
Twixie आणि Cowboy नावाच्या 'वधू-वरा'ची लग्नगाठ बांधली गेली. ती दोघंही Brussel Griffons Dogs आहेत.
त्या दोघांनाही लग्नाच्या वेळी नवरा-नवरीचा खास पोशाख घालण्यात आला होता.
अन्य डॉग-ओनर्सशी ओळखीसाठी डल्लासमधल्या तारा हेलविग यांनी आपल्या ट्विक्सीचं इन्स्टाग्राम पेज बनवलं होतं
दोन वर्षांच्या ट्विक्सीचे इन्स्टाग्रामवर 9000 फॉलोअर्स आहेत; तर काउबॉयचे 3000 फॉलोअर्स आहेत.
नॅशनल ब्रसेल्स ग्रिफिन रेस्क्यू लीगच्या माध्यमातून दोन्ही डॉग ओनर्सनी $2500 अर्थात दीड लाख रुपये उभे केले.
त्या पैशांतून दोन्ही डॉग ओनर्सनी वेडिंग सेरेमनीसाठी शानदार पार्टी आयोजित केली होती
हा खूप संवेदनशील डॉग ब्रीड असून, त्यांची एक्स्प्रेशन्स माणसांसारखीच असतात, असं डॉग ओनर्स म्हणतात.
उंदरांच्या शिकारीसाठी हा डॉग ब्रीड विकसित करण्यात आला होता. मांजरांशी त्यांचं अनेक बाबतींत साधर्म्य असतं.
टेक्सासमध्ये झालेला हा सोहळा म्हणजे या वीकेंडची सर्वांत छान पार्टी होती, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?